अर्जुनी मोरगाव येथील जि.प.हायस्कुलमध्ये अनागोंदी कारभार

0
26

अर्जुनी मोरगाव,दि.२६ः– गोंदिया जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि.यशवंत गणविर यांनी अचानक येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट देऊन शालेची पाहणी केली.यावेळी शाळेचे प्रभारी प्राचार्य डी.आर.ढवळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.प्राचार्य प्रभारी असल्याने त्यांच्यात प्रशासनाचा अनुभव नसल्याचे व त्यांचा प्रभाव पडत नसल्याचे निदर्शनास आले.
भेटीदरम्यान शालेय परिपाठ सुरू होता.यात शिक्षण विभाग जि.प.गोंदिया यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.दररोज परिपाठात संविधानाच्या तीन कलमांचे वाचन,पाच प्रतिज्ञांचे वाचन यांचा समावेश करण्यात आला आहे.परंतु संविधानाच्या कलमांचे स्पष्टिकरण केल्या जात नाही.पाच प्रतिज्ञांचे वाचन केल्या जात नाही.त्याचप्रमाणे शाळेत असलेल्या पटसंख्येच्या फक्त ६०% विद्यार्थी उपस्थित राहत असल्याचे आढळून आले.
परिपाठ संपल्यावर प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि इयत्ता आठवी ब वर्गात गेले असता त्या वर्गात शिक्षकच नव्हते.अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत असल्याचे या प्रकारामुळे लक्षात आले.लगेच उपाध्यक्ष इंजि.गणविर यांनी प्राचार्यांना धारेवर धरत यानंतर असे आढळून आल्यास शक्त कारवाई करण्यात येईल व कुणाचीही हयगय करणार नाही असे निर्देश दिले.यावेळी शाळा समितीचे सदस्य संतोष बुकावन उपस्थित होते.