खजरी उच्च माध्यमिक विद्यालयात विरबालक दिवस उत्साहात साजरा-

0
13

सडक/अर्जूनी,दि.26ः शिख समाजाचे दावे गुरू गोंविदसिंह यांचे पुत्र साहीबजादे जोरावर सिंह व फतेहसिंह यांनी अत्यंत लहान व्यक्त शिखर धर्माच्या अस्मितेसाठी मोगलांच्या विरोधात 26 डिसेंबर रोजी लढा देऊन शहीद झाले.यांचे शौर्य आजच्या पिढीला माहीत व्हावे,व ते प्रेरित व्हावेत यासाठी केंद्र शासनाने 26 डिसेंबर हा दिवस विद्यालय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले.या अनुसंगाने तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डोंगरगाव येथे ता.26 डिसेंबर, सोमवारी विरबालक दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्ष स्थानी प्राचार्य खुशाल कटरे होते.मुख्य मार्गदर्शन प्रा.सी.बी.टेंभरे यांनी केले.या प्रसंगी तंत्रस्नेही शिक्षक ए.डी.मेश्राम यांच्या मार्गदर्शनात परीक्षा पर चर्चा या उपक्रमांतर्गत प्राप्त प्रमाणपत्राचे वितरण सम्बधितांना करण्यात आले.