25.1 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home शैक्षणिक रिक्त पदांवर बदली मागण्याचा नाही अधिकार आणि नाव बदली अधिकार प्राप्त

रिक्त पदांवर बदली मागण्याचा नाही अधिकार आणि नाव बदली अधिकार प्राप्त

0
50
.शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीप्रक्रियेत दुर्गम भागातील शिक्षकांवर अन्याय
गोंदिया- दीर्घ प्रतीक्षेनंतर शिक्षकाच्या जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदल्या होत आहेत. यात एकूण 4 संवर्ग बनवण्यात आले आहेत, संवर्ग 1 व संवर्ग 2 यांची प्रक्रिया पुर्ण झाली. संवर्ग एक मध्ये विविध आजाराने ग्रस्त शिक्षक, 53 वर्षावरील शिक्षक याना शासनाने निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमानुसार बदली प्रथम प्राधान्याने घेता येते. संवर्ग दोन मध्ये जे पती-पत्नी तीस किलोमीटर अंतरापेक्षा लांब अंतरावर नोकरी करत आहेत त्यांना बदली प्राधान्याने सर्व रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर मागता येते.
संवर्ग 3 मध्ये जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम अडचणीतील शाळा निश्चित करून तेथील शिक्षकांना संबंधित शाळेवर तीन वर्षे सेवा पूर्ण झाली असेल तर बदली घेता येते अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हटले जाते.10 जानेवारी पासून संवर्ग 3 मधील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बडल्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली.पोर्टल वर जाऊन अर्ज भरताना शिक्षकांना रिक्त पदांवर बदली मागण्याचा अधिकार नाही. बदलीपात्र शिक्षकांच्या जागा संवर्ग 1 ने घेतल्याने त्या जागा सुद्धा उपलब्ध नाहीत, रिक्त जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतांना त्या दाखवत नाही.
बदली अधिकार प्राप्त शिक्षकाला निव्वळ रिक्त पदावर बदली मागता येत नाही.अर्ज भरताना आपल्याला हव्या त्या सोयीच्या दोन चार जागा भरण्याचा ही अधिकार नाही.30 पर्याय द्यावे लागतात.30 पर्याय भरणे म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात अशी अवस्था बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची झाली आहे.गोंदिया जिल्ह्यात बदलिअधिकार प्राप्त शिक्षकांची संख्या 149 असून त्यांना फक्त 45 जागा उपलब्ध आहेत, त्यातही गोंदिया तालुक्यात एकही जागा उपलब्ध नाही.
   समानीकरणाच्या धोरणाने अगोदरच खूप कमी निवडीची संधी राहिली होती.त्यात निव्वळ रिक्त पदेही संवर्ग तीन मधील शिक्षकाला दाखवली गेली नसल्याने अवघड क्षेत्रातील शिक्षकांचे अवघड झाले आहे.संघटना नेते सोयीस्कर भूमिका घेवून नेहमी प्रमाणे नरोवा कुंजुरोवा भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये असंतोष असून या अन्यायकारक बदलीविरोधात न्यायालयात न्याय मागण्याचा विचार करत आहेत.