24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home शैक्षणिक जि.प.प्राथमिक शाळा गोवारीटोला येथे जि.प.उपाध्यक्षांची आकस्मिक भेट

जि.प.प्राथमिक शाळा गोवारीटोला येथे जि.प.उपाध्यक्षांची आकस्मिक भेट

0
34

गोंदिया,दि.14ः- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि.यशवंत गणविर यांनी गोवारीटोला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट देत संपूर्ण शाळेत फेरफटका मारत भौतिक व मुलभूत सुविधांची पाहणी केली.शाळेतील दाखल खारीज रजिस्टर, शिक्षक व विद्यार्थी हजेरी पट, शालेय पोषण आहाराची तपासणी केली.गोवारी टोला शाळेची इमारत जुनी असल्याने इमारतीला भेगा पडल्या आहेत त्यामुळे लवकरच नवीन इमारत बांधली जाईल असे आश्वासन दिले.
या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र रहांगडाले, उपसरपंच नरेश कोहळे, मुख्याध्यापक आय.एल.कावळे, सहा. शिक्षक यु.के.बिसेन, मुकेश गौतम,धीरज औराशे,उमेश बोपचे, तेजस पटले, देवीलाल भोयर,चोपलाल पटले, हिरालाल रहांगडाले, एस आय पटले, रामू मडावी,सुरेंद्र गाते,ओमप्रकाश रहांगडाले,सच्चिदानंद पटले उपस्थित होते.