मुल्लाच्या जिल्हा परिषद शाळेत स्नेह संमेलनाचे आयोजन

0
21

देवरी,दि.२५- तालुक्यातील मुल्ला येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत दोन दिवसीय शालेय वार्षिक स्नेहसंमेलन आणि आनंद मेळाव्याचे आयोजन गेल्या बुधवारी (दि.24) करण्यात आले होते.

या संमेलनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते निलेश वालोदे यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितीचे उपसभापती अनिल बिसेन हे होते. प्रमुख अतिथी म्हणून देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, मुल्लाच्या सरपंच कल्पना बागडे, उपसरपंच सोनू मेंढे, केंद्रप्रमुख सत्यवान गजभिये, माजी उपसरपंच सीमा नाईक, ग्रापं.सदस्य यशवंत नागदेवे, मुकेश राऊत, राजकुमार कुथीर, वैशाली भेंडारकर, जगत कुरसुंगे, डिलेश्वरी घासले,सोनाली मरस्कोल्हे, सावित्री धुर्वे, ललिता भुते, सीताराम मेढे, पत्रकार सुरेश भदाडे, गेंदलाल लाडे, राजकुमार भेंडारकर, मुकुंद बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलानाच्या उद्घाटन प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्यासह रंगारंग कार्यक्रम सादर केले. यावेळी पाहुण्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि मातापालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका पी एन कुंभलकर यांनी केले. संचालन पदवीधर शिक्षक जी एस चांदेवार यांनी केले. उपस्थितांचे आभार शिक्षिका शितल उके यांनी मानले.

दोन दिवसीय मेळाल्याच्या उद्घाटनप्रसंगी शालेय विद्यार्थी , पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.