चित्रकला स्पर्धेत दतोर्याची याचना शिवणकर तृतीय

0
14

गोंदिया,दि.29ः येथील आदर्श सिंधी हायस्कूल मध्ये परीक्षा पे चर्चा अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत आयडियल अकादमीची 9 वी ची विद्यार्थीनी याचना मानिक शिवणकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.आरोग्य कसा जपावा व इतर संदेश चित्रकलेतून देण्यात आला.कार्यक्रमाचे उटघाटन जिल्हा परिषद सीईओ अनिल पाटिल यांनी केले.तर बक्षीस वितरण आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनी याचना मानिक शिवनकर मु.पोस्ट.दत्तोरा हिने कोरोना लसीकरणात भारत नंबर-१ या विषयावर चित्र काढून पुरस्कार प्राप्त केला.यावेळी पंचायत समितीचे सभापती मुनेश रहागंडाले उपस्थित होते.