गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी सुवर्ण पदकाने ९ फेब्रुवारीला सम्मानित होणार

0
85

गोंदिया / भंडारा : गोंदिया भंडारा जिल्ह्याचे स्वनामधन्य नेता व शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंती निमित्त गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील शालांत आणि पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक प्रदान करण्यासाठी ९ फेब्रुवारी २०२३ गुरुवारला सकाळी ११.०० वाजता गोंदिया येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य सुवर्ण पदक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सुवर्ण पदक वितरण समारंभात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते सुवर्ण पदक व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. सुवर्णपदक वितरण समारंभात कार्यक्रमांचे उद्घाटक राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्री प्रफुल पटेलजी व लोकमत समुहाचे अध्यक्ष माननीय श्री विजय दर्डाजी, उद्योगपती सज्जन जिंदल, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ व प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सुवर्ण पदकाने सम्मानित होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंदिया जिल्ह्याचे एस.एस.सी.मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त गुजराती नेशनल हायस्कुल, गोंदियाची कु. नक्षत्रा होमेश्वर बावनकर व शारदा कॉन्व्हेंट हाईस्कूल, गोंदियाची वेदी भुवनकुमार बिसेन, एच.एस.एस.सी.मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त एस. एम.पटेल ज्युनियर कॉलेज, गोंदियाची कु.आस्था अनिलकुमार बिसेन, गोंदिया जिल्ह्यात एच.एस.एस.सी. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त सरस्वती ज्युनियर कॉलेज अर्जुनी-मोरगावचा अमन रमेशचंद्र अग्रवाल, गोंदिया जिल्ह्यात बी.ए. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त एस.पी. कॉलेज, दासगावचा अलदिप चंद्रभान डहाट, गोंदिया जिल्ह्यात बी.कॉम. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त एन.एम.डी. कॉलेज, गोंदियाची कु.प्रगती रमेश चटवानी, गोंदिया जिल्ह्यात बी.एस.सी. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त इंद्राबेन हरिहरभाई पटेल साईन्स कॉलेज, गोरेगावची कु.काजल आनंदराव चौहान, बी. फार्मसी मध्ये मनोहरभाई पटेल इंस्टिट्यूट ऑफ़ फार्मसी, गोंदियाचा ओम धरमश्याम पटले व एस. एस. सी. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त वैनगंगा विद्यालय पवनीची कु. तन्वी दिपक तलमले, एच.एस.एस.सी भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त एस. जी. वी. डिफेन्स ज्युनियर कॉलेज, शहापुरचा नमीत मनिष व्यवहारे, बी.ए. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण जे. एम. पटेल कॉलेज, भंडाराचा शुभम अशोक ठोंबरे, बी.कॉम. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त जे. एम. पटेल कॉलेज, भंडारा चा मिहीर केशव चकोले, बी.एससी. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त जे. एम. पटेल कॉलेज, भंडारा ची कु. लिन्टा टॉमसन, बी. ई. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त मनोहरभाई पटेल इंस्टिट्यूट ऑफ़ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, भंडाराचा प्रशांत भरतराम तरोने यांचा समावेश आहे. सुवर्ण पदक वितरण समारंभास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. मनोहरभाई पटेल स्मृति समिती, श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, मनोहरभाई पटेल अकादमी, गोंदिया शिक्षण संस्था मार्फत श्रीमती वर्षाताई पटेल, माजी आमदार हरिहरभाई पटेल व माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी केले आहे.