2023 जिल्हा अंतर्गत बदल्यापूर्वी पदोन्नत्या व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी

0
39

गोंदिया —– महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने 2023 जिल्हा अंतर्गत बदल्यापूर्वी पदोन्नत्या व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणीचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, ग्राम विकास मंत्री, प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांना नुकतेच इमेलद्वारे निवेदन देण्यात आले.2022 ची जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया पूर्ण होताच सन 2023 ची बदली प्रक्रिया 1 मार्च 2023 पासून सुरु होणार असल्याचे विविध माध्यमांतून प्रसिध्द होत आहे.
काही जिल्ह्यांमध्ये दीड ते दोन वर्षे पदोन्नती न झाल्याने अनेक शिक्षक पदोन्नतीच्या लाभापासून वंचीत राहून सेवानिवृत्त होत आहेत. तसेच अनेक अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनही प्रलंबीत आहे.1 मार्च पासून सन 2023 ची बदली प्रक्रिया सुरु झाली तरी शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करणे, हरकती घेवून आवश्यक दुरुस्ती करणे यासाठी किमान 1 महिना कालावधी जाणार असल्याने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात विस्तार अधिकारी श्रेणी 3, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक या सर्व प्रकारच्या पदोन्नती घेण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषद प्रशासनास द्यावेत.
पदोन्नती पाठोपाठ मागील संचमान्यतेपासून काही शाळेत अतिरिक्त असलेल्या शिक्षकांना दि. 12/05/2011 च्या शासन निर्णयान्वये समायोजन करण्याबाबतही निर्देश सर्व जि. प. प्रशासनास व्हावेत. तसेच पदोन्नती, अतिरिक्त शिक्षक समायोजन व भरतीसाठी समाणीकरणची पदे खुली होत असल्याने पदोन्नती व अतिरिक्त समायोजनसाठी समाणीकरणाची सर्व पदे खुली करुन वरील दोन्ही प्रक्रिया घेण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, महिला राज्य अध्यक्ष अलका ठाकरे, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे ,राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाठविल्याची माहिती नेतराम बिजेवार,राजानंद वैद्य, दमयंती वैद्य, प्राजक्ता रणदिवे, जयश्री सिरसाटे, सरिता वराडे, संगिता घासले, उत्तम टेंभरे,एस. एम.बिसेन, कृष्णकुमार कुराये,सचिन इलमकर,सुरज कोल्हारे, परमानंद खोब्रागडे, रविंद्र शहारे यांनी दिली आहे.

गोंदिया जिल्ह्यात २०११ पासून पदोन्नती केलेली नाही.त्यामुळे अनेक शिक्षक वंचीत आहेत.काही सेवानिवृत्त झाले.२०१६ पासून सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली नाही.त्यामुळे लवकरात लवकर पदोन्नती कार्यशाळा आयोजित करण्यात यावी.= हरिराम येळणे जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती गोंदिया