नवेगाव/धापे. शाळेतील तीन विद्यार्थी LFW उपक्रमात, Quarter final round करिता सिलेक्ट..!!

0
12

गोंदिया,दि.19ः- तालुक्यातील नवेगाव/धापेवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीचे तीन विद्यार्थ्यांची LFW उपक्रमात, Quarter final round करिता निवड झाली आहे.त्यामध्ये श्रष्टी सुनील टेंभरे, उपवंश लुकेश पटले व पूर्वी महेंद्र बागडे यांचा समावेश आहे.

वर्गाचे विद्यार्थी सहजरीत्या वाचू, लिहू शकतात मोठे इंग्रजी शब्द..स्वतः मोबाईलवर लिंक ओपन करून वर्षभर सोडवीत असतात ऑनलाईन टेस्ट..सरावांती quiz link आली की, सहभागी विद्यार्थी ऑनलाईन quiz वर्षभर उत्सुकतेने सोडवीत असतात..!!”

नुकतेच आलेल्या LFW राज्यस्तरीय elimination round च्या रिझल्ट मध्ये, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा नवेगाव/धापे., केंद्र भानपुर, ता. जी. गोंदिया, येथील तिसऱ्या वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेऊन, रिझल्ट लिस्ट मध्ये, सुरुवातीलाच अनुक्रमे 4,5,6 क्रमांकावरच नावे असून, श्रष्टी सुनील टेंभरे, उपवंश लुकेश पटले, पूर्वी महेंद्र बागडे हे उत्तुंग भरारी घेतलेले यशस्वी विद्यार्थी आहेत.
उपक्रमी शिक्षक श्री सी. एच. बिसेन सर, हे गुणवत्ता वाढीस्तव, सातत्याने दरवर्षी विविध उपक्रम शाळेत/वर्गात राबवित असतात. सरांनी त्याचपैकी lfw (leaf for word) संस्था मुंबई संचालित, इंग्रजीच्या भरीव गुणवत्ता वाढीस्तव, इयत्ता 3 री करिता हा उपक्रम, चालू शैक्षणिक सत्रात, अथक प्रयत्नांतून यशस्वीरीत्या राबविला.
Lfw संस्थेकडून सहज सोप्या क्लृप्त्यायुक्त मार्गदर्शनात्मक व्हिडिओ, सरावातमक पीडीएफ, इतर सूचना व सरावांती सोडविण्यासाठी weekli quiz, असे ई लर्निग साहित्य व्हॉट्सअपवर ग्रुपवार येत असतात. रजिस्टर केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडून वेळच्या वेळी सराव करून घ्यायचा असतो.
शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, सी. एच. बिसेन, कु. सी. डी. गजभिये, एम. एन. उके, ए. टी. सेंदुरकर, सौ. एल. आर. राऊत, आर. एच. राऊत, कु. तृप्ती ठाकरे, कवरे भाऊ, सौ. संध्याबाई कवरे यांनी यांनी गोड कौतुकासह पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.