आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत सटवा जि.प.शाळा तालुक्यातून द्वितीय

0
21

* अदानी फाऊंडेशन तिरोडा येथे अतिथींच्या हस्ते झाला शाळेचा गौरव
गोरेगांव- जिल्हास्तरीय आमची शाळा आदर्श शाळा उपक्रम अंतर्गत तालुक्यातून सटवा जिल्हा परिषद शाळेने तालुका पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला असून 11 मार्च रोजी तिरोडा येथील अदानी फाऊंडेशन येथे शाळेला 30 हजार रुपयांचे पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार जिल्हा परिषद गोंदिया मुख्य कार्यकारी अधिकारी शितल फुंड, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. महेंद्र गजभिये, गोंदिया डायटचे अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, अदानी फाऊंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी विमुल पटेल, जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, प्रकल्प अधिकारी अडाणी फाऊंडेशन राहुल शेजोव यांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा व उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी तसेच केंद्रप्रमुख यांना बक्षीस देउन गौरविण्यात आले.
गोरेगाव तालुका मधून द्वितीय क्रमांक पुरस्कार सरपंच अर्चनाताई ठाकूर, गोरेगांव गटशिक्षण अधिकारी एन.जे.सिरसाटे, शाळेचे मुख्याध्यापक एन.सी.बिजेवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर राणे, उपाध्यक्ष लोकेश बघेले, माजी सरपंच रमेश ठाकूर, माजी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष रामेश्वर रहांगडाले, रहांगडाले सर, हरिणखेडे सर, बिसेन सर, पुरी मैडम, कटरे मैडम, शाळा नायक हिमांशू पारधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी तेजस्वी रहांगडाले, उप नायक हर्षदा भगत प्रामुख्याने उपस्थित होते.