गुरुजींच्या बदलीने विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.. न जाण्यासाठी विद्यार्थ्यांची आर्त साद..

0
11

सांगली : जत तालुक्यातील पांडोझरी-बाबरवस्ती जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांची आंतरजिल्हा बदलीने विद्यार्थी भावूक झाले.त्यांच्याभोवती कडे करुन थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.सर,तुम्ही जाऊ नका.म्हणून विणविण्या व आर्त साद घातली.शिक्षकाची श्रीमंती विद्यार्थ्यांच्या प्रेमवर, मायावर असते.घटनेने दिसून आले.
पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक द्विशिक्षिकी वस्ती शाळेत दिलीप वाघमारे हे जून २०११ साली नोकरीला आले.त्यावेळी एका खोलीत शेळ्या तर एका खोली शाळा भरत होती.ऊसतोडणी मजूर,शेतमजूर,मेंढपाळ पालकांची मुले आहेत.विद्यार्थी गळतीचे प्रमाण अधिक होते.
सह-शालेय उपक्रम, पालक भेटी,शैक्षणिक उठाव पालक संपर्क,शैक्षणिक जागृती केली.पटसंख्या वाढली.गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शैक्षणिक दर्जा उंचावला.त्यांना या वर्षाचा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला
वस्तीवर ४० कुंटुंब व्यसन मुक्त, ज्ञानरचनावाद,बाला पेंटींग, बोलक्या भिंती,वृक्ष लागवड व संगोपन हे उपक्रम राबविले.शाळेला ७ गुंठे जागा प्राप्त करुन घेतली.शाळा डिजिटल,ज्ञानरचनावाद शाळा,मूल्यवर्धन यशोगाथा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक अभ्यासक्रमात शाळेची मूल्यवर्धन यशोगाथा समाविष्ठ झाली.आकाशवाणी, दूरदर्शनवर शाळा उपक्रम कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.जत तालुक्यातील द्विशिक्षिकी आयएसओ नामांकन प्राप्त,शाळेला स्वच्छ सुंदर शाळा,जिल्हास्तरीय क्रांतीजोति आदर्श,राज्यस्तरीय सेवा सन्मान सर्वांगसुंदर शाळ,राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार शाळेला मिळाले आहेत.

वाघमारे यांची नांदेडला बदली झाली.शालेय व्यवस्थापन समिती,ग्रामस्थांनी शाळेत निरोप सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ दिलीप वाघमारे भावूक झाले.मुलांच्या मनात आदर, हळवा कोपरा होता.निरोपावेळी सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.सोशल मीडियावर याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.अनेकांच्या व्हिडिओ पाहून डोळे पाणावलेले पाहण्यास मिळाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पवार यांनी केले.सूत्रसंचालन तानाजी कोकरे यांनी केले.माजी जि.प.अध्यक्ष आण्णासाहेब गडदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती गडदे,येळवीचे मुख्याध्यापक भारत क्षिरसागर व विद्यार्थांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी आण्णासाहेब गडदे,मारुती गडदे,शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष दिपाली बाबर,मनोहर पवार, हणमंत गडदे, राजाराम गडदे, मलाप्पा कोरे, कविता कोरे,सविता मोटे,सुनिता गडदे,रियाज जमादार,उपसरपंच मल्लेशप्पा गडदे, शिक्षक संघटनेचे भारत क्षिरसागर ,मलाप्पा कोरे,तुकाराम कोरे,मारुती बाबर,,केरुबा गडदे, दत्तात्रय बाबर,निंगाप्पा वज्रशेट्टी, माजी विद्यार्थी,शिक्षक, समितीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.आभार अनिल पवार यांनी मानले.
“शिक्षणापलिकडे मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पर्यावरण, व्यसनमुक्तीचे अनेक उपक्रम राबविले.मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली. मुलांना आपलेसे केले.ऋणानुबंध निर्माण झाला. शिक्षकापेक्षा मी त्यांचा मित्र, दादा आहे.”
दिलीप वाघमारे
मुख्याध्यापक, बाबरवस्ती.