Home शैक्षणिक एक्यूट पब्लिक शाळेत गुणवंतांचा सत्कार

एक्यूट पब्लिक शाळेत गुणवंतांचा सत्कार

0

गोंदिया,दि.27- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण द्वारा फरवरी/मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या वर्ग १२वी (HSC) च्या परीक्षेत एक्यूट पब्लिक स्कूल गोंदिया मधिल गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार स्कूलतर्फे २६मे रोजी पार पडला.यामध्ये वाणिज्य शाखा व विज्ञान शखेचा निकाल १००% लागला. वाणिज्य शाखेतिल प्रज्ज्वल लिल्हारे (९१.१७%), हार्दिक पाचे (८९.८३%) यांशू धुर्वे (८०.८३%) गुणाने पास झालेत.विज्ञान शाखेतिल हरीश पगरवार (८५.१७%), धनश्री पारधी (८३%), श्रद्धा चंद्रवंशी (८२.८३%) व दिव्या ऊमारकर (८२.८३%) गुण प्राप्त करून प्रविष्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.
सर्व गुणवंतांचा व पलकांचे सत्कार व अभिनंदन कार्यक्रमाकरिता संस्थापक संजय भास्कर, सहसचिव शुभा शाहारे, प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थांयांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आले. या प्रसंगी संजय भास्कर व शुभा शाहारे  यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाकरिता मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्या करिता शुभेच्छा देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन कु.सानिया यांनी केले व आभार प्रदर्शन एकता पटले यांनी मानले.

Exit mobile version