दहावीच्या परिक्षेत गोंदिया जिल्हा नागपूर विभागात प्रथम,जिल्ह्याचा निकाल 94.15 टक्के

0
24

गोंदिया- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाचा यंदा 93.83 टक्के निकाल लागला.तर नागपूर विभागाचा निकाल 92.05 टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचा 94.15 टक्के निकाल लागला असून विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गोंदिया जिल्ह्याचा निकाल 94.15 टक्के निकाल लागला.जिल्हयातील 81 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांनाही चागंली कामगिरी केली आहे.तालुकानिहाय निकाला तिरोडा तालुका 95.74 टक्के,सालेकसा तालुका निकाल 94.74 टक्के,सडक अर्जुनी तालुक्याचा निकाल 94.87 टक्के,गोरेगाव तालुका 90.48 टक्के,देवरी 92.81 टक्के,अर्जुनी मोरगाव 94.54 टक्के,आमगाव 94.29 टक्के तर गोंदिया तालुक्याचा निकाल 94.33 टक्के लागला आहे.परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याची टक्केवारी 91.87 तर विद्यार्थीनींची टक्केवारी 96.58 आहे.यावर्षी 18 हजार 010 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली,त्यापैकी 17886 परिक्षेला बसले तर 16841 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूलचा निकाल 99.44 टक्के
स/अर्जुनी- जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालीत आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी मार्फत, मार्च 2023 मध्ये नागपूर बोर्डाच्या वतिने आयोजित इ.10 वी चा निकाल 99.44 % लागलेला आहे.मार्च 2023 मध्ये आयोजित इ.10 वी च्या परीक्षेत, विद्यालयातून-एकूण 180 परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 179 परीक्षार्थी उतिर्ण होऊन,शाळेचा 99.44 %निकाल लागला.प्राविण्य श्रेणीत 117,प्रथम श्रेणीत-56.द्वितीय श्रेणीत 06,तृतिय श्रेणीत-00 यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष -जगतराम रहांगडाले,सचिव- नारायणराव येळे, सहसचिव- सौ.विमलताई रहांगडाले उपाध्यक्ष-सौ.सी.एन.येळे ,कोषाध्यक्ष-डाॅ.सचिन रहांगडाले , गटशिक्षणाधिकारी सुभाषराम बागडे,केंद्र प्रमुख श्री.चांदेकर,जगत नारायण ब्रिलियंट अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक से.नि.प्राचार्य खुशाल कटरे,प्राचार्य आर..के.कटरे, शाळा समीतीचे सदस्य इंद्रराजबापू राऊत,उमावि प्रभारी प्रा.वाय.टी.परशुरामकर, विज्ञान शाखा प्रभारी प्रा.संजय येळे, वरिष्ठ शिक्षक डी. डी. रहांगडाले,के.जे.लांजेवार, आर. जी. लांजेवार, जे. वाय. लंजे , प्रा.डी.के.मांढरे,दिपक दिघोरे,तसेच सर्व उमावि ,मिडल व हायस्कूल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.