40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात सदभावना दिवस

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात सदभावना दिवस

0
23

blank

गोंदिया,दि.07ः येथील गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात भारताचे माजी पतंप्रधान राजीव गांधी यांची जयंती दरवर्षी ‘सदभावना दिवस’ म्हणनू साजरी केली जाते.सर्व धर्म,भाषा आणि प्रांतातील लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्द वाढवणे हा सदभावनेचा विषय आहे.’सद्भावना दिवस’ पाळण्या मागची कल्पना हिंसा टाळणे आणि लोकांमध्ये सदभावना वाढवणे आहे.या अनुषगांने धोटे बंंधू विज्ञान महाविद्यालयाध्ये
प्राचार्य डॉ.अजंन नायडू यांच्या मार्गदर्शनात ‘सदभावना दिवसाच्या पुर्व संध्येला सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यां सोबत ‘सदभावना प्रतिज्ञा’ घेतली. याप्रसंगी इतर शिक्षकांसोबत डॉ.जयतं महाखोडे प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे समन्वयन डॉ.स्नेहा जयस्वाल यांनी केले.

blank