शासकीय मुलींची निवासी शाळा डव्वा लोकनृत्यात प्रथम तर शहीद जान्या तिम्या जि. प..हायस्कूल भूमिका अभिनय स्पर्धेत प्रथम
गोंदिया, (दि. 4): राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प मान्य कृती आराखडा क्र. 4 नुसार ‘Co curricular activities 2023-24‘ अंतर्गत जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया च्या वतीने स्थानिक श्री राजस्थान कन्या हायस्कूल गोंदिया येथे दि. 03 ऑक्टोंबर 2023 रोजी करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी लोकसंख्या शिक्षण विभागप्रमुख श्रीमती पूनम घुले यांनी सर्व उपस्थितांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने स्वागत करून प्रास्ताविकात स्पर्धेचा उद्देश व नियम सांगितले. या स्पर्धेत जिल्ह्यातील 6 तालुक्यामधील 12 चमूंनी सहभाग नोंदविला होता. त्यात भूमिका अभिनय स्पर्धेत शहीद जान्या तिम्याजि. प.हायस्कूल गोरेगाव ता. गोरेगाव यांनी प्रथम क्रमांक तर लोकनृत्य स्पर्धेत शासकीय मुलींची निवासी शाळा डव्वा ता. सडक अर्जुनी ला प्रथम क्रमांक मिळाला असून दोन्ही चमू विभागस्तरासाठी पात्र झाल्या आहेत.
स्पर्धेची सांगता व बक्षिस वितरण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत यांचे अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख तथा अधिव्याख्याता पूनम घुले होत्या. तर परीक्षक म्हणून पंचशील हायस्कूल मक्काटोलाचे शिक्षक साहित्यिक, नाटककार मिलिंद रंगारी, जि. प. व. प्रा. शा. खर्रा चे संगीत शिक्षक राधेश्याम चौधरी यांनी भूमिका बजावली. कार्यक्रमाची रूपरेषा अधिव्याख्याता पूनम घुले यांनी सादर केली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक मुकेश रहांगडाले तर आभार साधनव्यक्ती शालिनी रहांगडाले यांनी व्यक्त केले. पारितोषिक वितरणाची जबाबदारी साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी पार पाडली. सर्व विजेत्या चमुंना प्राचार्य डॉ. रमेश राऊत व अधिव्याख्याता पूनम घुले यांचे शुभहस्ते प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्या प्रथम क्रमांकाची चमू विभाग स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
हे ठरले विजेते- भूमिका अभिनय स्पर्धा
प्रथम क्रमांक- शहीद जान्या तिम्या जि. प..हायस्कूल गोरेगाव ता. गोरेगाव
द्वितीय-जि. प.हायस्कूल वडेगाव ता. तिरोडा
तृतीय-जि. प.हायस्कूल ककोडी ता. देवरी
लोकनृत्य स्पर्धा –
प्रथम क्रमांक- शासकीय मुलींची निवासी शाळा डव्वा ता. सडक अर्जुनी
द्वितीय- शासकीय मुलींची निवासी शाळा सरांडी ता. तिरोडा
तृतीय-जि. प.हायस्कूल ककोडी ता. देवरी