मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे तालुकास्तरावर सुयश

0
7

गोरेगाव :– स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव मधील वर्ग 10 वी ची विद्यार्थिनी कु. ख़ुशी कैलास पुंजे हिने संविधान गौरव परीक्षा 2023 मध्ये तालुका स्तरावर तृतीय क्रमांक पटकावुन शाळेला गौरवन्वित केले आहे. त्याचबरोबर कु. रिया विक्रम भेलावे हिला प्रोत्साहन पर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या दोन्ही विध्यार्थिनींना त्यांच्या यशाबद्दल शाळेचे संस्था सचिव प्रा. आर डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी सी बी पटले, प्राचार्या सौं. सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक कु. एस. डी. चीचामे यांनी अभिनंदन करून कौतुक केले. विध्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय संस्था सचिव, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्या, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक, व शाळेतील सर्व शिक्षकांवृंद व आपले आईवडील यांना दिले.