५१ व्या तालुका विज्ञान प्रदर्शनी मध्ये जि.प.शाळा वडेगाव येथील शिक्षक मनीष कोल्हे अव्वल

0
27

वडेगाव- नुकतीच तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोडा येथे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनी पार पडली त्यामध्ये शिक्षक गटातून जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील विज्ञान शिक्षक मनिष प्रल्हाद कोल्हे यांनी विज्ञान प्रदर्शनीत reflection of light phenomenon या विषयावर उत्कृष्ठ पद्धतीने सादरिकरन केले. या सादरीकरणात निरीक्षकांनी शिक्षक गटातून प्रथम क्रमांक दिलेला आहे व जिल्हास्तरावर निवड झालेली आहे.त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य एस. पी. ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन विज्ञान शिक्षक मनिष कोल्हे सरांचे सत्कार करण्यात आले यावेळी क्रीडा व्यवसाय मार्गदर्शक प्रीतेश भांडारकर, स्काऊट गाईड आयुक्त प्रदीप मेश्राम, एम एम पौलकर, जी डी कटरे, आर टी वानखेडे, व्हीं एस ईरले, संदीप शेंडे, नंदकिशोर सुसतकर, सुधीर भाजीपाले, व्ही एफ बीसेन, के जी पंधरे, एम एस कुथे ,संजय पटले, सुरेश डोंगरे, विनोद सयाम, व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरांचे स्वागत करून जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.