31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक स्नेह संमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांसाठी पोषक-एड.टी.बी.कटरे

स्नेह संमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांसाठी पोषक-एड.टी.बी.कटरे

0
55

blank

 -पी.डी.राहांगडाले विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन*
गोरेगाव – विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वेळेनुसार समाजासमोर आणने आवश्यक आहे. शालेय जीवनात स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे कला गुण , कौशल्य समाजासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळतो. शिक्षणासोबतच क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागिता विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. स्नेह संमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांसाठी पोषक आहे, असे प्रतिपादन एड.टी.बी.कटरे यांनी केले.ते येथील पी.डी.रहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव व पी डी आर कान्व्हेंट येथील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दि.28 डिसेंबरला बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ टी.पी.येळे, माजी प्राचार्य पी.एफ.बघेले, खेमेंद्र कटरे,हि.दा.येळे,बा.डो.पटले,डी.डी. रहांगडाले,दुर्गाप्रसाद राहांगडाले,प्राचार्य सी.डी.मोरघडे, पर्यवेक्षक ए.एच.कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा, अपूर्व विज्ञान मेळावा, रांगोळी व पुष्पगुच्छ स्पर्धा, सामुहिक नृत्य व नाटकाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य सी.डी.मोरघडे यांनी केले.blankतसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सी.आर.बिसेन, सौ.एम.डी.रहांगडाले, सौ.ए.एस.बावनथडे,कु.एस.आर.मांढरे,सौ.जयश्री पारधी, कु.एस.जी.दमाहे, प्रा.डी.बी.चाटे, प्रा.एस.एम.नंदेश्वर, प्रा.डी.एम.राठोड, सौ.एस.पी.तिरपुडे , आर.टी.पटले,.वाय के चौधरी,आर.वाय.कटरे, जी.डब्लू.राहांगडाले,एस.आर. राहांगडाले,प्रा.ए.जे.सोरले,भुमेश राहांगडाले, प्रा.जे.वाय.बिसेन, सौ.भुमेश्वरी राहांगडाले ,एम बी कोटांगले,झेड सी राऊत व विद्यार्थी प्रतिनिधी मोहित गौतम,आलेमा पठाण,आरती शेंद्रे ,दिया येळणे, रोशनी सरजारे तस्लीम कुरैशी, यांनी सहकार्य केले.

blank