‘माय भारत-विकसित भारत@2047’ भाषण स्पर्धा,ममता तुरकरची राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड

0
28

जिल्ह्यातून 20 स्पर्धकांचा सहभाग  

          गोंदिया, दि.11 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र गोंदिया व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 10 जानेवारीला ‘माय भारत-विकसित भारत@2047’ विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे आयोजन एन.एम.डी. महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.

        ‘माय भारत-विकसित भारत @2047’ भाषण स्पर्धेचा शुभारंभ गोंदिया शिक्षण संस्था सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात  महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.शारदा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली  नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रृती डोंगरे, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ.संगिता घोष, पुर्व रासेयो जिल्हा समन्वयक डॉ.बबन मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. जिल्ह्यातून 20 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

        यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ.शारदा महाजन म्हणाल्या, युवा शक्ती परिवर्तनाची वाहक आणि परिवर्तनची लाभार्थी आहे. कोणत्याही राष्ट्राच्या जीवनकार्यात इतिहास एक वेळ देते तेव्हा राष्ट्र आपली विकास यात्रेत गतीने प्रगती करु शकतो. प्रत्येक विश्वविद्यालय हे विद्यार्थी आणि युवक यांच्या ऊर्जाला ‘विकसित भारत’ चे सामान्य लक्ष्यास प्राप्त करण्याच्या दिशाकरीता आवश्यक असल्याचे रेखांकीत केले.

         नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रृती डोंगरे म्हणाल्या “युवा शक्ती ही विचारधारा महाविद्यालय आणि विश्वविद्यालयात  युवकांकरीता करियर करण्यास निर्णायक ठरेल. असेही लक्षात येते की, आजचे युवक हे राष्ट्राचे भविष्य आहेत. जे एक नवीन कुटूंब आणि एक नवीन समाज बनवतात. त्यांना ठरविण्याचा अधिकार आहे की, एक विकसित भारत कसा असला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

          जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त ममता सेवकराम तुरकर ही राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे. सदर स्पर्धेत द्वितीय क्रमांक आकांशा रविन्द्र तुरकर, तृतीय क्रमांक अमित ठाकरे यांनी प्राप्त केले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच सहभागी प्रतिभागी पायल शहारे, अश्विनी माहूर्ले, मासुम पटले, सौरभसिंग चव्हाण, सोनाली रहांगडाले, विशाल लाडे, विकास खैरे, प्रज्वल पाथोडे, स्नेहा मेश्राम,स्वप्नील चंद्रिकापुरे यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून डॉ. संगिता घोष, डॉ. किशोर वासनिक, डॉ. तारण पटले, डॉ. संजय जगने यांनी कार्य पार पाडले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बबन मेश्राम यांनी केले. सुत्रसंचालन पुजा डोंगरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पुनम दमाहे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता देवकुमार राऊत, डिंपल ढोरे, झामसिंग बघेले, शिवानी हाडगे, मनिष दहिकर, गणेश टेकाम, सागर सुर्यवंशी, अजय फुंडे, विनय मेंढे, प्रीती पुराम, निकिता उके, आरती खोब्रागडे, रोशन कुंभलकर ,ओम परमार, रविंद्र कावळे, अत्तदिप वालदे, गुणेश्वरी येडे, प्रणाली पारधी यांचेसह राष्ट्रीय सेवा योजना व नेहरु युवा संगठनचे स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.