त्या आश्रमशाळेला कारणे दाखवा नोटीस

0
6
वाशिम दि 18-मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतीगृहात केवळ 20 ते 25 मुलीच निवासी असतात. बाकी सर्व मुले गावातील आहेत. गावातील या मुलांची नावे वसतीगृह हजेरीपटावर दाखवून संस्थेचे पदाधिकारी हे मागील तीन वर्षापासून अनुदान लाटत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे वाशिम येथील सहायक आयुक्त एम.जी वाठ यांनी या आश्रमशाळेला 1,2 आणि 4 जानेवारी 2024 रोजी पत्राद्वारे कारणे दाखवा नोटीस दिली आहे.याबाबत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त श्री.वाठ यांनी दिली.