आमदार अग्रवालांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा सालईटोला येथील प्रवेशद्वाराचे लोकार्पण

0
7
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम निलागोंदी अंतर्गत सालईटोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. शाळा प्रवेशद्वार बांधकाम आणि परिसर सौंदर्यीकरण साठी एकूण ७ लक्ष रुपये खर्च करण्यात आले असून या पूर्वी देखील शाळेच्या संरक्षक भिंती साठी २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. गावाच्या विकासासाठी शाळा महत्त्वाची असून उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी घडविणे आवश्यक असल्याचे मत यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. सोबतच शाळेतील रिक्त पदांवर स्वयंसेवक शिक्षक नियुक्त करा आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार नियोजन करा निधीची पर्वा करू नका असे आश्वासन देखील आमदार विनोद अग्रवाल यांनी शाळा व्यवस्थापनाला दिले.
दरम्यान सौ. सुशीलाताई जगदीश लील्हारे, जि प सदस्य विजय उईके, पं स. सदस्य हिरामण दहाट,  कृष्णकुमार जयस्वाल, विक्की बघेले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चुन्नीलाल रहांगडाले, सुभाष शेंडे,  दुलीचंद उईके, पोलीस पाटील दिनेश कळीनहाके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष हंसाराम ठाकरे, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष गेंदलाल ठाकरे, उपसरपंच नरेश धूर्वे, ग्राम पंचायत सचिव जी सी ठाकूर, ग्राम पंचायत सदस्य रेखलालजी भलावी, भागेश बिजेवार, पुस्तकलाताई गजभिये, जागृतीताई हरीणखेडे, सत्यशिला मडावी, लक्ष्मीबाई उईके, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि गावकरी उपस्थित होते.