गोरेगाव –जल जीवन मिशन जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धेत स्थानिक पी डी राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथील वर्ग अकरावी कला विभागाची कु. तुलसी राजकुमार रोकडे या विद्यार्थिनीने या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून 5500रु व प्रमाणपत्र असे पारितोषिक पटकावले आहे.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.टी.पी.येडे,सचिव ऍड.टी.बी.कटरे,संचालक यू.टी.बिसेन,प्राचार्य सी.डी.मोरघडे, पर्यवेक्षक ए.एच.कटरे,मार्गदर्शन शिक्षक सी.आर.बिसेन, डी.बी.चाटे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.