डवकी येथील सिद्धार्थ कनिष्ट महाविद्यालयात निरोप समारंभ

0
70

देवरी,दि.१८ : तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग १२ वीच्या विद्यार्थांना निरोप काल शनिवारी (दि.१७) देण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम हे होते.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून देवरीचे ठाणेदार प्रवीण डांगे, मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या प्रा. वर्षा गंगणे, मरामजोब येथील शिवराम विद्यालयाचे प्रा.धनराज हुकरे,ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण नाईक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामू परसगाये आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. मेश्राम म्हणाले, स्पर्धेच्या युगात चांगली प्रगती करण्यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय ठरवायचे असते. त्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत या तीन गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. तरच जीवनामध्ये आपण प्रगती करू शकतो. प्रा गंगणे यांनी आपल्या संबोधनातून विद्यार्थांनी स्वतःमधील गुण व क्षमता ओळखून आपले ध्येय ठरवावे. तसेच अपयश आले तरी खचून न जाता सामना करण्याची जिद्द ठेवावी. याप्रसंगी ठाणेदार डांगे, प्रा.हुकरे,लक्ष्मण नाईक ,रामू परसगाये यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेंद्र बोरकर, सुषमा जवांजर, ममता टेंभूर्निकर,सरिता मेश्राम,धर्मेंद्र भोवते, विधार्थांमध्ये प्रेरणा लांजेवार, दिव्या भूरकुडे, कावेरी मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रेरणा नाईक तर उपस्थितांचे आभार श्री बोरकर यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .