….अखेर ओबीसी विद्यार्थी विद्यार्थींनींना शासकीय वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा

0
24

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 5 मार्चपर्यंत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

गोंदिया, दि.20 :राज्यातील सर्व ओबीसी संघटनांसह ओबीसी अधिकार मंच,ओबीसी युवा अधिकार मंच,स्टुडंटस राईटस असो.ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,ओबीसी जनमोर्चासह इतर संघटनाच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्याकरीता शासनाने मंजूर केलेले 72 वसतीगृह सुरु करण्याकरीता आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते.त्यातच गोंदियासह विदर्भातील जिल्ह्यात वसतिगृहाकरीता भीख मांगो आंदोलनही करण्यात आले होते.15 फेब्रुवारीपर्यंत वसतिगृह सुरु करण्याचे आश्वासन ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिले होते.त्यानुसार 16 फेबुवारीला ओबीसी बहुजन कल्याण विभागाने पत्र काढून ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता आॅफलाईन विद्यार्थ्याकंडून अर्ज आमंत्रित केले आहे.उच्च शिक्षण घेत असलेल्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 5 मार्च पर्यंत आपले अर्ज सादर करावयाचे आहेत.

ओबीसी बहुजन कल्याण विभागातंर्गत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकरीता जिल्हास्तरावर 100 विद्यार्थी/विद्यार्थीनी क्षमतेचे शासकीय वसतिगृह सुरु करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष सन 2023-24 करीता शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाकरीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

        तरी गोंदिया जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी 5 मार्चपर्यंत संबंधित वसतिगृहांचे गृहपाल यांचेशी संपर्क साधून वसतिगृहात प्रवेश मिळण्याकरीता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याकरीता आवाहन करण्यात आले आहे.

        सन 2023-24 करीता वसतिगृह निहाय रिक्त जागा :- इतर मागासवर्ग करीता- 46, विमुक्त जाती भटक्या जमाती करीता- 30, विशेष मागास प्रवर्ग करीता- 05, दिव्यांग करीता- 04, अनाथ करीता- 02 व आ. मा. प्रवर्ग (EMW)- 03, तसेच खास बाब करीता- 10 असे प्रत्येकी दोन्ही वसतिगृहांकरीता एकूण 100 जागा रिक्त आहेत.

        अर्ज वितरण व स्विकृतीकरीता विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आरटीओ ऑफिसचे मागे, गोंदिया (मो. 8275299320) आणि विद्यार्थीनींनी मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, आरटीओ ऑफिसचे मागे, गोंदिया (मो. 8459908530) या वसतिगृहांमध्ये संपर्क करुन अर्ज घेऊन जमा करायचे आहे.तसेच अधिक माहितीकरीता विद्यार्थी/विद्यार्थीनी व पालकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे संपर्क साधावे असे आवाह समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

अर्ज करण्याचे वेळापत्रक- 20 फेबुवारी ते 5 मार्च 2023 अर्ज स्विकारणे                                                      पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार प्रसिध्द करणे-15 मार्च 2024                                                      पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत-25 मार्च 2024                                                            रिक्त जागेवर दुुसर्या यादीमधील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिध्द करणे-28 मार्च 2024            दुुसर्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे- 5 एप्रिल 2024