आमची शाळा आदर्श शाळा.. उपक्रमांतर्गत उचेपूरची शाळा जिल्ह्यातून तृतीय

0
26

देवरी.दि.२१- जि.प गोंदिया आणि अदानी फाऊंजडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या आमची शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत देवरी पंचायत समिती मधील उचेपूर येथील जि.प. प्राथमिक शाळा तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.

ककोडी केंद्रांतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उचेपूर ही देवरी सारख्या मागास भागातून मानाचे स्थान पटकाविल्याबद्दल जि. प. सदस्य उषा शहारे, प.स. सदस्य अनुसया सलामे, गटशिक्षणाधिकारी महेन्द्र मोटघरे, शिक्षण विस्तार अधिकारी वाघमारे,गट समन्वयक धनवंत कावळे, केंद्र प्रमुख एस.जी.राऊत, राजेश रामटेके,श्री ठेंगाहे,सुजित बोरकर, शैलेश बागडे, अतुल गणवीर, दीपक लांजेवार उमेश भरणे, शेंदरे, वलथरे, संतोष मस्के, विजय लोथे, शर्मा गाते, संजय मेश्राम आणि ककोडी केंद्रातील सर्व शिक्षक आदींनी उचेपूर शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिवणकर, प्रियंका रामटेके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.