मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेचा तालुकास्तरिय निकाल जाहीर

0
427

देवरी,दि.२१- शैक्षणिक सत्र २०२३-२४ अंतर्गत देवरी पंचायत समितीमध्ये राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमाचा तालुका स्तरिय निकाल आज (दि.२१) जाहीर करण्यात आला.

चालू शैक्षणिक सत्रात गेल्या १४ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान जिल्हा परिषद, शासकीय, खासगी अनुदानिक शाळांचे  मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत राबविण्यात आलेल्या कार्याचे मूल्यांकन तालुका मूल्यांकन समिती मार्फत करण्यात आले. या अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळांचे मूल्याकंन करून स्पर्धेचा निकाल आज जाहिर करण्यात आला.

यामध्ये जिल्हा परिषद शाळा गटातून सावली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मेहताखेडा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आणि मासूलकसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनुक्रमे प्रथम, द्वितिय आणि तृतीय मूल्यांकनाच्या मानकरी ठरल्या. खासगी अनुदानित शाळा गटातून देवरी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, मरामजोब येथील शिवराम विद्यालय तर लोहारा येथील सुरतोली माध्यमिक विद्यालय या शाळा अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय मानांकनासाठी पात्र ठरल्या.

या उपक्रमांतर्गत पात्र शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पर्यवेक्षण समिती यांचे देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेद्र मोटघरे यांनी अभिनंदन केले.