हरिहरभाई पटेल हायस्कुल चिरचाळबांध येथे चित्रकला व निंबध स्पर्धेचे आयोजन

0
14

आमगाव,दि.23– तालुक्यातील हरिहरभाई पटेल हायस्कुल चिरचाळबांध येथे सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने विद्यार्थ्याकरीता चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.हायस्कुलचे प्राचार्य बन्सीधर शहारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला माजी शिक्षणाधिकारी एस.बी.खंडागळे,सौ.मीनाताई खंडागळे,व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक विजय बहेकार,सौ.बहेकार,से.नि.प्राचार्य उल्हास तागडे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक कु. सीमा बागडे,कु.ललिता लांजेवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, तसेच व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धर्मेन्द्र मेहर यांनी केले तर आभार हरित सेना प्रमुख के.जी मडावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.