शासकीय वसतिगृहांमध्ये OBC विद्यार्थी/विद्यार्थीनी प्रवेशासाठी 5 मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित

0
18

गोंदिया, दि.01 : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकरीता जिल्हास्तरावर 100 विद्यार्थी/विद्यार्थीनी क्षमतेचे शासकीय वसतिगृह सुरु करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष सन 2023-24 करीता शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाकरीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

        तरी जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष सन 2023-24 करीता शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाकरीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहांचे गृहपाल यांचेशी संपर्क साधून वसतिगृहात प्रवेश मिळण्याकरीता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

        सन 2023-24 करीता अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जातील, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

        अर्ज वितरण व स्विकृतीकरीता विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आर.टी.ओ. ऑफिसच्या मागे, गोंदिया (मो. 8275299320) आणि विद्यार्थीनींनी मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, आर.टी.ओ. ऑफिसच्या मागे, गोंदिया (मो. 8459908530) या वसतिगृहांमध्ये संपर्क साधावा. अधिक माहितीकरीता विद्यार्थी/विद्यार्थीनी व पालकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे संपर्क साधावा. असे समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.