एमएचटी सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

0
22
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ‘सीईटी’ परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांसह बी.एस्सी, नर्सिंग, विधी (पाच वर्ष) अशा विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकतेच जाहीर केले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) जवळपास २० अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेतली जाते. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच सीईटी सेलने जाहीर केले होते.

प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लानिंग आणि कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘एमएचटी सीईटी २०२४’ परीक्षा (पीसीबी/पीसीएम ग्रुप) १६ ते ३० एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार होती.

आता ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेअंतर्गत पीसीबी ग्रुपची परीक्षा २२ ते ३० एप्रिल दरम्यान, तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत होणार आहे. यासह अन्य प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

तसेच ‘एमएएच-पीजीपी सीईटी, पीजीओ-सीईटी, एम.एस्सी-सीईटी’ या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सीईटी सेलने अधिकृत संकेतस्थळाद्वारे जाहीर केले आहे.

*️️अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :*

www.mahacet.org

*सीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक :*

*परीक्षा :- कालावधी*

एमएचटी-सीईटी : पीसीबी ग्रुप- २२,२३,२४,२८,२९, आणि ३० एप्रिल २०२४, पीसीएम ग्रुप- २,३,४,५,९,१०,११,१५ आणि १६ मे २०२४

एमएएच- एएसी सीईटी : १२ मे २०२४

एमएएच-बी.ए/बी.एस्सी बी.एड (चार वर्ष इंटिग्रेटेड कोर्स) : १७ मे

एमएएच-एलएलबी (पाच वर्ष) : १७ मे

एमएच- नर्सिंग सीईटी : १८ मे

एमएएच- बीएचएमसीटी सीईटी : २२ मे

एमएएच- बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीईटी : २७ ते २९ मे