40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home शैक्षणिक बिकट परिस्थितीवर मात करत जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थीनीचे सत्कार

बिकट परिस्थितीवर मात करत जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थीनीचे सत्कार

0
25

blank

 भंडारा :-  शिक्षण हे वघिनिचे दूध आहे , जो हे प्रश्न करेल तो  गुरगुरनारच ह्या बाबासाहेबांच्या उक्तिचा पुरेपुर संदर्भ कु.सानियाने दिला. नुकताच 12 वी सिबीएससीचा निकाल  लागला यात जिल्ह्यातुन महर्षी विद्या मंदिर ची विद्याथीनी कु.सानिया मंगेश नारनवरे हिने 96 टक्के गुण घेत जिल्ह्यात प्रथम क्रमन्क पटकावला.तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतुन , दोन खोल्यांच्या घरात राहून जिद्दीने दिवसाची रात्र करत अभ्यास करुन आई वडिलांच्या शिरात मानाचा शीरपेच रोवन्यात यशस्वी झाली. सानिया अभ्यासात अत्यंत तल्लख असल्याने ती  8 वी पासूनच नवोदय विद्यालयात शिकली.नीटच्या अभ्यासला वेळ मिळत नसल्याने तिने महर्षि विद्यालयात प्रवेश घेतला व जिद्दीने अभ्यास करून यश सम्पादित केले. त्यानिमित्त भंडारा शहरातील विविध पक्षातील प्रतिनिधी यांनी सानिया नारनवरे या मुलींनी बिकट परिस्थितीवर मात करत जिल्ह्यात प्रथम आल्याने सानियाचा सत्कार करत  तिला पुढच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यात भाजपा महामंत्री तथा माजी उपाध्यक्ष आशु गोंडाने, रिपाई आ जिल्हाध्यक्ष असित बागड़े, डॉ बाबासाहेब आम्बेडकर सार्वजनिक जयंती समिति चे अध्यक्ष विनय बंसोड़, अजित बंसोड़, शरद खोब्रागडे, सूरज डोंगरे, तसेच सानिया चे वडील मंगेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम तथा आई अल्का व मोठे बाबा उपस्थित होते.