तिरोडा,दि.२०ःअदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा जिल्हा परिषद शाळा गुमाधावडा येथील इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरीता अदानी फाउंडेशन प्रमुख श्री बिमुल पटेल यांचे मार्गदर्शनाखाली उन्हाळी शिबिरा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला गावच्या सरपंच श्रीमती पद्मा कंगाली, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील श्रीपात्री, अदानी फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी राहुल शेजव, शाळेचे मुख्याध्यापक संतोष पारधी ग्रामपंचायत सदस्य गण, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजित शिबिरामध्ये विद्यार्थ्यांकरीता कथाकथन, पेपर क्राफ्ट, सायन्स विथ फन, अग्निसुरक्षा, चित्रकला, पेपर बॅग बनविणे, ग्रीटिंग कार्ड, आरोग्य विषयक मार्गदर्शन यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन लोकेश चौरावर, गिरीश कुलकर्णी, निखिलेश गोळे, डॉ करिष्मा लांजे यांच्यासारख्या तज्ञ साधन व्यक्तींच्या माध्यमातून करण्यात आले होते.शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष पारधी व इतर शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.