छत्रपती शिवाजी संकूल देवरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0
133
वाढदिवसाच्या शुभेच्छा

देवरी,दि.२१-  देवरी येथे कृष्णा सहयोगी शिक्षण संस्था,आरोग्य भारती, तालुका विधी समिती, आणि योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.२१) शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजे दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

स्थानिक शिवाजी संकुलात आयोजित शिबिरात योग समितीचे गणेश मुनेश्वर व योग समितीचे सदस्यांनी उपस्थितांना योग व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
याप्रसंगी देवरीच्या दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीस चरडे मॅडम, अॅड. प्रशांत संगीडवार, डॉ. सुनील येरणे, डॉ. प्रियंका येरणे, उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि  प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होत्,

 यावेळी मा. सौ. चरडे मॅडम यांनी उपस्थितांना योग दिनाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. सुनिलकुमार येरणे यांनी मानले. याप्रसंगी “करो योग रहो निरोग” चा नारा देऊन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे समापन करण्यात आले.