यशवंतग्राम चिचटोला येथील जि.प.प्राथमिक शाळेला गावक-यांनी ठोकले कुलूप

0
9445

*गावक-यांचा प्रशासनावर रोष;शाळा शिक्षकांविना पाठपुरावा करूनही शिक्षकांची नियुक्ती नाही

‌ ‌ *प्रशासनाचे उडवाउडवीची उत्तरे::शाळा स्वयंसेवकांचे भरोश्यावर ‌

‌ सडक अर्जुनी(महेंद्र टेंभरे):--तालुक्यातील यशवंतग्राम चिचटोला येथे इयत्ता १ ते ४ पर्यंत जि.प.प्राथमिक शाळा आहे.शाळेची पटसंख्या ३८ एवढी आहे.शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते.शाळेतील शिक्षक एस.डी.कापगते यांची पदोन्नतीने बदली झाली. शाळेत दुसरे शिक्षक पी.बी.नांदगाये कार्यरत होते.नांदगाये शिक्षक ३१ ऑगस्ट २०२४ ला सेवानिवृत्त झाले.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शासन व प्रशासनाने शाळेत दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केली असून या स्वयंसेवकांचे भरोश्यावर शाळा सुरू आहे.शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक टि.सी.ची मागणी करून आपल्या पाल्यांचे दुस-या शाळेत नाव दाखल करीत आहेत.यामुळे आमची शाळा,गावची शाळा बंद पडण्याचे मार्गावर आहे.शाळेला नविन शिक्षकांची मागणी करून पाठपुरावा करण्यात आला.मात्र शासन व प्रशासन यांनी दखल घेतली नसल्याने संतप्त गावक-यांनी,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रा.प.प्रशासनाने ३१ ऑगस्ट २०२४ रोजी शाळेला कुलूप ठोको आंदोलन करून कुलूप ठोकले आहे.तसेच येणा-या विधानसभा निवडणूकीत जि.प.शाळेत बुथ न लावू देण्याचा निर्धार गावक-यांनी केला आहे. ‌. ‌ यशवंतग्राम चिचटोला येथील जि.प.प्राथमिक शाळा अनेक पुरस्कार प्राप्त आदर्श शाळा म्हणून नावारूपास आहे.मात्र शासन व प्रशासन यांचे दुर्लक्षाने सदर शाळा बंद पडण्याचे मार्गावर आहे.या शाळेला सन २००७ मध्ये राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार,सन २०२३ मध्ये अदानी फाउन्डेशन तर्फे तालुक्यातून स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून प्रथम पुरस्कार मिळाले आहे.तसेच शाळेला स्वच्छ व सुंदर शाळा मोहीमेंतर्गत सानेगुरुजी आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाले आहे.मात्र शाळा समिती,ग्रा.प.प्रशासन व गावक-यांनी शासन ,प्रशासन यांना अनेकवेळा निवेदन देऊन पाठपुरावा केला.पण याची दखल घेण्यात आली नाही.शिक्षणाधिकारी(प्राथ) जि.प.गोंदिया,गटशिक्षणाधिकारी पं.स.सडक अर्जुनी,गटविकास अधिकारी पं.स.सडक अर्जुनी ,गटविकास अधिकारी (उच्चश्रेणी)पं.स.सडक अर्जुनी,सभापती पं.स.सडक अर्जुनी व अन्य लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन पाठपुरिवा एक- दिड महिन्यापासून करीत आहेत.मात्र आजपावेतो नविन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही.प्रशासनाने शाळेला दोन स्वयंसेवकांची नियुक्ती करून शाळेला वा-यावर सोडले आहे.सध्या शाळेचा कारभार स्वयंसेवकांचे खांद्यावर असून तेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे.अनेक पुरस्कार प्राप्त आमची शाळा,गावची शाळा शिक्षकाअभावी बंद पडण्याचे मार्गावर आहे.शिक्षक नसल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांची टि.सी.ची मागणी करून दुस-या शाळेत नाव दाखल करीत आहेत.शासन व प्रशासन यांनी शिक्षकांची पुर्तता न केल्याने ३१ ऑगस्ट २०२४ रोजी संतप्त गावक-यांनी व शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रा.प.प्रशासन यांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेऊन कुलूप ठोकले.त्यावेळी गटविकास अधिकारी बागडे उपस्थित होते.त्यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे देऊन पत्रकार येत असल्याचे समजताच तेथून पसार झाले. ‌

आमचे शाळेत दोन शिक्षक होते.पण येथील एका शिक्षकाची पदोन्नतीने बदली व एक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शाळा शिक्षकाविना आहे.विद्यार्थी शाळेबाहेर बसले आहेत.सर्व गावकरी व पदाधिकारी मिळून शाळेला ताला ठोको आंदोलन केले आहे.प्रशासनाला सांगायचे आहे की,सदर शाळा राज्यातून प्रथम पुरस्कार प्राप्त शाळेला जर शिक्षक देत नसाल तर आमचे पाल्य काय करतील.काय शिक्षण घेतील व त्यांची काय अवस्था होईल.गटविकास अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन व्यवस्था करू असे आश्वासन देऊनसुद्धा पंधरा दिवसापासून शिक्षकाची नियुक्ती केली नाही. ‌ ‌ अनिता अनिरूद्ध बांबोळे माजी सरपंच चिचटोला ‌ ‌ ‌  ‌ आमच्या गावची शाळा दोन महिन्यापासून स्वयंसेवकांवर अवलंबून आहे.२५ जुलै पासून शाळेला नविन शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी ,म्हणून सतत लोकप्रतिनिधी व प्रशासनास पाठपुरावा करीत आहो.मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.म्हणून शाळेला कुलूप ठोकण्याचा सर्व गावकरी व पदाधिका-यांनी निर्णय घेतला आहे.
निर्मलाताई तेजराम कापगते सरपंच चिचटोला

आमचे शाळेला २२जुलैपासून एक शिक्षक कार्यरत आहे.व एका शिक्षकाची पदोन्नतीने बदली झाली.आम्ही २५ जुलैला शिक्षणाधिकारी(प्राथ),गटशिक्षणाधिकारी,गटविकास अधिकारी,सभापती व आमदार महोदय यांना निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला.तरीपण याची दखल घेण्यात आली नसल्याने व एक महिन्यापासून शिक्षक रूजू न झाल्याने आम्ही शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करीत आहोत.धनजंय श्रीराम कापगते अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चिचटोला* ‌ ‌
एक शिक्षक पदोन्नतीने बदलून गेल्याने व एक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे रिक्त जागेवर शासनाने कोणाचीही नेमणूक केली नाही.आता आमचे गावचे शाळेला शिक्षकच नाही‌.यशवंतग्राम व आदर्श ग्राम असे अनेक पुरस्कार प्राप्त शाळा आज बंद होण्याचे मार्गावर आहे‌.शासनाने याची त्वरीत दखल घ्यावी.शरद शिवकुमार कापगते (पालक )चिचटोला