तंबाखूमुक्त महाराष्ट्राची पंचशील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

0
234

अर्जुनी मोरगाव,दि.०१- तालुक्यातील बाराभाटी येथील पंचशील विद्यालय येथे दि.३१ ऑगस्टला विद्यार्थ्यांनी संकल्प-तंबाखूमुक्त महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शपथ घेतली.परिपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम लक्षात आणून दिले.तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे अल्प व दीर्घ होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले.तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनावर बंदी घालण्यासाठी भारत सरकारने केलेल्या कायद्याची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांना तंबाखूची भयानकता लक्षात आणून दिल्यानंतर शेवटी मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणार नाही व घरातील तसेच शेजारील लोकांना सुद्धा सेवन करू देणार नाही अर्थात सर्व मिळून तंबाखूमुक्त महाराष्ट्र निर्माण करू असा संकल्प यावेळी घेण्यात आला.याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रामुख्याने विद्यार्थी उपस्थित होते.