धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र संस्थेची कार्यकारीणी गठित

0
56

गोंदिया,दि.०२– येथील गोंदिया शिक्षण संस्थेच्या धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागात प्राणीशास्त्र संस्था- २०२४-२५ स्थापित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, जीवसृष्टी आणि त्यांचे संवर्धन याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली धोटे बंधू सायन्स कॉलेज गोंदियाच्या प्राणीशास्त्र विभागात नुकतीच प्राणीशास्त्र सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. गुणवंत गाडेकर, विभागप्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ.शीतल जुनेजा बॅनर्जी, डॉ. भूषण बघेले आणि डॉ. सोनल वर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.प्रारंभी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.शीतल बॅनर्जी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नव्याने स्थापन झालेल्या संस्थेच्या अध्यक्षांचे स्वागत केले.
2024-25 च्या शैक्षणिक सत्रासाठी प्राणीशास्त्र संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष- कु. रचना शॉ (B.Sc 5th Sem), उपाध्यक्ष-निखिल शरणागत(B. Sc 5th Sem),सचिव नितेश आगाशे आणि सहसचिव कु.सिमरन आसवानी (बी. एससी 5वी सेमी) आणि सदस्यामध्ये कु.तनिषा यादव,कु. सृष्टी बावनकर,कु.वासू चौधरी,कु.पलक शर्मा,कु.पल्लवी कात्रे,कु.सलोनी पारधी,कु.पायल महारवाडे, कु.अचल राऊत, कु.मोहिनी गाडे, कु.रोशनी येरणे, कु.रुचिता शरणागत आदींचा समावेश आहे.सर्व सत्रातील B. Sc प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.