संदिप तिडके यांना मिळाला राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

0
1678

गोंदिया,दि.0७: महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार (प्राथमिक गट) गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली (तालुका देवरी) येथील उपक्रमशील शिक्षक संदिप तिडके यांना देण्यात आला.

समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. हे पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने संबोधले जातात.२०२३-२४ च्या पुरस्कारासाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली (तालुका देवरी) येथील उपक्रमशील शिक्षक संदिप तिडके यांना दिनांक ०५ सप्टेंबर २४ ला शिक्षक दिनी मुंबई येथील टाटा नाट्य सभागृहात देण्यात आला.पुरस्कार वितरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शालेय सचिव कुंदन मॅडम, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे व इतर मान्यवर उपस्थित होते.