वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाशिम दि.७ सप्टेंबर– शासनाने https://mahadbtmahait.gov.in महाडीबीटी पोर्टल अनुसूचित जाती, विजा,भज,इमाव, व विमात्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती / शिक्षण फी, परीक्षा फी, योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी दि.२१ सप्टेंबर पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने सन २०२४-२५ मधील विजा,भज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व इतर योजनांचे https://mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर अर्ज भरणे बाबत विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावरून अवगत करावे. तसेच महाविद्यालयीन सन २०२४-२५ वर्षाकरिता विजा,भज, इमाव, व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणीकृत होतील याकडे लक्ष द्यावे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य यांना आवाहन करण्यात येते की, आपल्या स्तरावरून सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास अवगत करून तसेच महाडीबीटी पोर्टल https:// dbtworkflow.mahadbtmahait.gov. in या संकेतस्थळावरून संबंधित महाविद्यालयांनी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती / शिक्षण फी, परीक्षा फी, (फ्रीशिप) योजना व इतर ऑनलाईन झालेल्या सर्व योजनांच्या विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यांच्या लॉगिनला तात्काळ ऑनलाईन पाठवावे. तसेच पात्र विद्यार्थी उक्त योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्यार्थ्यांकडून शासन अनुज्ञेय शुल्क वसूल केल्यास संबंधित महाविद्यालय शासन निर्णयानुसार कारवाईस पात्र राहील याची नोंद घ्यावी.असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहाय्यक संचालक दीपा हेरोळे यांनी केले आहे.