video..गोंंदियात निघाला राज्यसरकारच्या विरोधात शिक्षकांचा मोर्चा

0
1103

गोंदिया,दि.२५– शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संच मान्यता व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा शासन निर्णय खेड्यापाड्यातील वस्तीवरील आणि विद्यार्थ्यावर अन्यायकार करणारा आहे, परिणामी दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत. या मागणीसाठी राज्यातील सर्व (Zilla Parishad school) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आज 25 सप्टेंबर रोजी रजा घेत आंदोलन केले.जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद राहिल्या तर जवळपास ३०० च्या वर शाळा ज्यामध्ये शिक्षणसेवक कार्यरत आहेत,अशा शाळा मात्र सुरु होत्या.राज्य समन्वय समितीच्यावतीने या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.गोंदियाच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून शिक्षकांचा मोर्च्याची सुरवात झाली.तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोचून सभेत रुपांतरीत करण्यात आला. 
या मोर्च्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा प्रभाव आणि संघाच्या शिक्षकांची संख्या मात्र इतर संघटनाच्या तुलनेत अधिक बघावयास मिळाली.सोबतच प्राथमिक शिक्षक समिती,शिक्षक भारती संघटना,शिक्षक सहकार संघटना,पुरोगामी शिक्षक संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले.
असे आहेत मुख्य मागण्या
शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांमध्ये 15 मार्च 2024 च्या संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने वास्तव अडचणी लक्षात घेता आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे,  शैक्षणिक कामाच्या निर्णयात शिक्षक संघटनासह चर्चा करून दुरुस्ती करावी, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब देण्यासाठी राबवलेली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी, ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत तिथे स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासाची सक्ती रद्द करावी, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सर्व पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, जुन्या पेन्शनचे आदेश निर्गमित करावेत आदी मागण्यांचा समावेश आहे.