मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ५६९ ज्येष्ठ नागरिकांची निवड

0
1084

“जिल्ह्यातील ६० वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिक करणार भारतातील तीर्थक्षेत्रांची वारी”

पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे अध्यक्षतेखालील समितीमार्फत ५६९ ज्येष्ठ नागरिकांचे प्रस्ताव मंजूर

गोंदिया –मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ५६९ ज्येष्ठ नागरिकांचे प्रस्ताव पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे अध्यक्षतेखालील समितीमार्फत मंजूर करण्यात आले. हे नागरिक लवकरच तिर्थदर्शला जातील असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६० वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिक भारतातील तीर्थक्षेत्रांची वारी करणार आहेत.
राज्यातील सर्व धर्मियांतील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना” राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
सदर योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात वैष्णोदेवी मंदिर कटरा (जम्मू व काश्मिर) तिर्थक्षेत्राकरीता १३६ ज्येष्ठ नागरीकांची, श्रीराम मंदीर अयोध्या (उत्तरप्रदेश) तिर्थक्षेत्राकरीता २४०, महाबोधी गया तिर्थक्षेत्राकरीता ३३, काशी तिर्थक्षेत्राकरीता २६, विठोबा पंढरपूर तिर्थक्षेत्राकरीता ३२, तिरुपती बालाजी तिर्थक्षेत्राकरीता १७, द्वारकाधीश तिर्थक्षेत्राकरीता ७, काशी विश्वनाथ तिर्थक्षेत्राकरीता ४५, गंगोत्री मंदीर उत्तरकाशी तिर्थक्षेत्राकरीता २, महाकालेश्वर उज्जैन
मंदीर तिर्थक्षेत्राकरीता १०, साईबाबा देवस्थान शिर्डी तिर्थक्षेत्राकरीता ८, सिद्धीविनायक मंदीर तिर्थक्षेत्राकरीता ५,केदारनाथ तिर्थक्षेत्राकरीता ३, अजमेर दर्गा तिर्थक्षेत्राकरीता ३, जगन्नाथ पुरी तिर्थक्षेत्राकरीता १, रामेश्वरम तिर्थक्षेत्राकरीता
१, असे एकूण १६ तिर्थक्षेत्राकरीता एकूण ५६९ ज्येष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक लवकरच श्रीराम मंदिर, अयोध्या ची मोफत वारी करणार आहेत.

सदर तिर्थदर्शन योजनेकरीता जिल्ह्यातील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा
मैदान, गोंदिया येथे आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावे असे विभागाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे. विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण कल्याण, गोंदिया यांनी केले आहे.