– मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय.
– जिल्ह्यातील 57 कर्मचाऱ्यांना लाभ.
गोंदिया,दि.३०ः गेल्या 20 वर्षापासून समग्र शिक्षा च्या दिव्यांग विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या राज्यातील 3105 विशेष शिक्षकांना शासन सेवेत कायम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.याबद्दल गोंदिया जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहे.
याचा गोंदिया जिल्ह्यातील 57 कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून या निर्णया करीता दिव्यांग विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी आभार मानले असुन संपूर्ण कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
जिल्हयातील या कर्मचाऱ्यांमध्ये 2 जिल्हा समन्वयक, 16 तालुका समन्वयक व 39 विशेष शिक्षकांचा समावेश आहे.
सदर निर्णय घेण्याकरिता शासनाने ” सर्वोच्च न्यायालयाने 2016 मध्ये दिव्यांग मुलांकरीता विशेष शिक्षक पद निर्मिती शासनाचे करावी ” या आदेशाचा संदर्भ घेतला असल्याची माहिती या वेळी जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी दिली. याकरिता त्यांनीं मुख्यमंत्री यांच्या सह यासाठी मेहनत घेणारे लातूरचे आमदार अभिमन्यू पवार व गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी याकरीता सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दलही विशेष आभार मानले आहे.
समग्र शिक्षाच्या दिव्यांग विभागातील 3105 विशेष शिक्षक शासन सेवेत कायम
वाढदिवसाच्या शुभेच्छा