गोरेगांव,दि.०२ – स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगांव मधील शिक्षकांनी महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे द्वारा आयोजित विडिओ स्पर्धा मध्ये उत्कृष्ट वीडियो तयार केले त्यांची तालुका स्तर तसेच जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या शिक्षकामध्ये इयत्ता वर्ग 9 व 10 -इंग्रजी – सौ. सविता टी इळपाचे – जिल्हा स्तर तृतीय, वर्ग 9 व 10 – इंग्रजी – सौ. सविता टी इळपाचे – तालुका प्रथम
भाषा – सौ. नमिता एम. कटरे – तालूका द्वितीय- सौ. कोमलता एन. पटले – तालुका तृतीय, वर्ग 6 वी ते 8 वी –
इंग्रजी – श्री रमेश बी. कोल्हे – तालुका तृतीय, भाषा – सौ. कोमल ए. रहांगडाले तालुका तृतीय.वर्ग 3 री ते 5 वी –
इंग्रजी – सौ. यामिनी जी. पटले – तालुका प्रथम ,वर्ग 1 ली व 2 री – सौ. भाग्यश्री ए. चौहान – तालुका तृतीय,
विजयी सर्व शिक्षकांचे शाळेच्या वतीने संस्था सचिव प्रा. आर डी कटरे, प्रशा. अधिकारी श्री सी. बी. पटले, प्राचार्या सौ सी. पी. मेश्राम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.