मुंबई:-१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या वेळापत्रकानुसार दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या काळात होणार आहे. तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ या काळात होणार आहे. हे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता.
वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा:- https://mahahsscboard.in/mr