तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये श्रद्धा गौतम प्रथम तर सार्थक जक्कुलवार तृतीय

0
35

अर्जुनी/मोर.: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १० व ११ डिसेंबरला पंचशील विद्यालय बाराभाटी येथे करण्यात आले होते.
हे विज्ञान प्रदर्शन प्राथमिक व माध्यमिक अश्या दोन गटांमध्ये घेण्यात आले होते. तालुक्यातील सर्व शाळांनी या प्रदर्षणीमध्ये सहभाग घेतला होता.
त्यात प्राथमिक गटांमध्ये जी. एम.बी. इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथील सार्थक सुजित जक्कुलवार याने प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन या प्रयोगासह सहभाग घेतला व त्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच माध्यमिक गटांमध्ये जी. एम.बी. इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथील श्रद्धा योगेंद्र गौतम हिने भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या प्रयोगासह सहभाग घेतला होता. त्यात तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा, जयप्रकाश भैय्या (संस्थाध्यक्ष) , सचिव सर्वेश भुतडा, समन्वयक भगीरथ गांधी, प्राचार्य जे. डी. पठाण, प्राचार्य शैव्या जैन, उप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल, मुख्याध्यापक कल्पना भुते, प्रा. टोपेशकुमार बिसेन, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.