खासदार व जिल्हाधिकारी जागा देण्यात ठरले अपयशी
खेमेंद्र कटरे/गोंदिया -केंद्रसरकारच्या मानव संशाधन व मनुष्यबळ मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी केंद्रीय विद्यालय मंजूर केले जाते.नुकतेच ८५ नवीन केंद्रीय विद्यालयांना मंजुरी देण्यात आली असून महाराष्ट्रातील अकोला,रत्नागिरी व पुणे जिल्ह्यात नव्या केंंद्रिय विद्यालयांना मंंजुरी देण्यात आली.सोबतच राज्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील बालाघाट-सिवनी लोकसभा मतदारसंघात बरघाट,तिरोडी येथेही विद्यालय मंजूर झालेले आहे.तेच केंद्रिय विद्यालय शेजारील गडचिरोली जिल्ह्यात पुर्णत्वास येऊ लागलेले असताना १ डिसेंबर २०१६ रोजी मंजूर झालेले गोंदियाच्या केंद्रीय विद्यालयाला गेल्या ८ वर्षापासून जागेकरीता संघर्ष करावा लागत आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकरीता अहोरात्र झटणारे व आम्हीच मंजुर केल्याचे नेहमी गवगवा करणारे या जिल्ह्यातील एकाही खासदाराला केंद्रिय विद्यालयाकरीता जिल्हाधिकारीकडून जागा मिळवून घेता आली नाही,ही शोकातिंका लोकप्रतिनिधींकरीता ठरली आहे.तर २०१६ पासून आजपर्यंत एकाही जिल्हाधिकार्यांने सुध्दा मनाने पुढाकार घेत जागेचा प्रश्न निकाली काढलेला नसल्याने या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी हे जिल्ह्याप्रती कसे उदासिन आहेत हे बघावयास मिळत आहे.या केंद्रिय विद्यालयात केंद्रसरकारच्या परिक्षा बोर्डाअंतर्गतचे शिक्षण दिले जाणार असून शासकीय नोकरदारापासून ते सर्वसामान्यांच्या मुलांना प्रवेश मिळणार आहे.
भंडारा येथील जवाहरनगर स्थित केंद्रीय विद्यालय प्रशासनाला गोंदिया येथे केंद्रिय विद्यालय सुरु करण्यासाठी १० एकर जागेचा शोध घेण्यासंदर्भात 2017 मध्येच निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार त्यावेळच्या जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्यांनी पाठपुरावा सुध्दा केला मात्र त्याना यश आले नाही.शिक्षणाच्या क्षेत्रात नक्षलग्रस्त,आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यासाठी हे विद्यालय सेमीअर्बंन म्हणून मंजुर झाले आहे.
गोंदिया येथे हे केंद्रीय विद्यालय सुरु करण्यासाठी भंडारा येथील जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.त्यानुसार जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य महिपाल आणि त्यांच्या चमूने १९ जानेवारी 2017 रोजी गोंदिया येथे येऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन केंद्रिय विद्यालय सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली होती.तसेच विद्यालयासाठी गोंदिया शहराच्या परिसरात सुमारे १० एकर जागा हवी असल्याची माहिती दिली.या चर्चेमध्ये गोंदिया शहराच्या लगत शासकीय जागेचा त्वरीत शोध घेऊन अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देशही तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिले होते.त्यानंतर मात्र पाच वर्षापर्यंत कुठलाच पाठपुरावा यासंदर्भात न झाल्याने केंद्रिय विद्यालयाच्या जागेचा प्रश्न अधातंरीच राहीला.
२०१७ नंतर २८ एप्रिल २०२३ रोजी जवाहरनगर येथील तत्कालीन प्राचार्यांनी विद्यमान जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांची भेट घेत जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात पत्र दिले होते.तसेच गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनीही जागेकरीता एक बैठक घेतली होती,त्या बैठकीनंतर मात्र काहीच पुढे झालेले नाही.तर केंद्रीय विद्यालयाला सरसकट एकाच ठिकाणी १० एकर जागेची गरज असतांना जिल्हा प्रशानाने दोन तुकड्यात जागा देण्याचा विचार केला होता अशी माहिती पुढे आली आहे.विशेष म्हणजे यासंदर्भात एकाही लोकप्रतिनिधीने प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला नाही.
देशातल्या ज्या जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला केंद्रीय विद्यालय नव्हते अशा ठिकाणी हे विद्यालय मंजुर करण्यात आले होते.यामध्ये गोंदियाचा समावेश सुध्दा आहे.आधीपासूनच केंद्रसरकारच्या अंतर्गत असलेले नवोदय विद्यालय हे नवेगावबांध येथे सुरु आहे.त्यातच आत्ता नवे केंद्रीय विद्यालय मिळाल्याने खेड्यापाड्यातीलच नव्हे तर आदिवासी भागातील विद्याथ्र्यांना महागड्या सीबीएसईच्या शांळाएैवजी शासनाच्याच शाळेतून कमी पैशात सीबीएसईचे शिक्षण उपलब्ध होण्याची संधी गेल्या ८ वर्षापासून हिरावून घेतली गेली असून अजून किती वेळ लागणार हे निश्चित नाही.
मानवसंधाशन मंत्रालय करणार नोकर भरती
या केंद्रिय विद्यालयासाठी जो काही स्टाप लागणार आहे,त्या पदाची भरती मानव संशाधन व मनुष्यबळ मंत्रालयातर्गत येत असलेले केंद्रीय विद्यालय संघटन हे देशपातळीवर करणार आहे.सुरवातीला नजीकच्या केंद्रीय विद्यालयातील शिक्षक वर्ग प्रतिनियुक्तीवर पाठवून ही केद्रीय शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला जातो.
सुसज्ज व्यायामशाळेसोबतच प्रयोगशाळा
नव्याने सुरु होणाèया केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व विद्याथ्र्यासांठी सुसज्ज अशी व्यायामशाळा राहणार आहे.सोबतच इयत्ता १ ते ५ पर्यंतसाठी एक,इयत्ता सहा ते १० वी पर्यंतसाठी एक आणि इयत्ता ११ ते १२ वी साठी एक अशा तीन स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा राहणार आहेत.आरटीईमधील प्रवेश घेतलेल्या मुलांना निशुल्क शिक्षण मिळणार तर बीपीएलमधील मुलांना नाममात्र प्रवेश शुल्क लागणार आहे.सोबतच शासकीय कर्मचाèयांच्या मुलांनाही नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.
केंद्रीय विद्यालयासाठी टीबी हॉस्पीटलची जागा पर्याय
गोंदिया येथे नव्याने सुरु होणाèया केंद्रीय विद्यालयासाठी १० एकर जागेची गरज आहे.एवढी मोठी जागा शासकीय सध्यातरी शहरानजीक कुठेच दिसून येत नसल्याने जुने टी.बी.हॉस्पीटलची जागा ही एक पर्यायी जागा होऊ शकते.शहराला लागून आणि सर्वसुविधाजनक ही जागा असल्याने जिल्हाप्रशासनाने ही जागा शिक्षणाचा दृष्टीकोन समोर ठेऊन उपलब्ध करुन देण्याची मागणी ओबीसी संघटनांनी आपल्या अनेक निवेदनातून शासनाकडे केली आहे.मात्र जिल्हाधिकारी ही जागा शिक्षणाची संधी उपलब्ध होणार्या केंद्रीय विद्यालयाला देण्यास का नकार देत आहेत,हे कोडे ठरले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा मिळताच कारवाई
गोंदियातील केंद्रीय विद्यालयाच्या जागेसंदर्भात जवाहरनगर येथील केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्याना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.जागेसंदर्भात पत्र दिले आहे.त्या पत्राच्या अनुषगांने शहरानजीक असलेली जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे.सध्या तरी जागा मिळालेली नाही,मात्र २०२३ मध्ये दोन तुकड्यात जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता,तो केंद्रीय विद्यालय प्रशासन मंडळाने नाकारत एकत्र जागेची भूमिका कळविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा मिळताच कारवाई करण्यात येईल असे नोडल अधिकारी व जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्य निलम मेश्राम यांनी सांगितले.