सरस्वतीबाई महिला विद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन

0
203

गोंदिया: शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया द्वारे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन सरस्वतीबाई महिला विद्यालय, गोंदिया येथे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चिंतामणी स्कूल ट्रस्ट चे अध्यक्ष नीरज पटेल तसेच विशेष अतिथी म्हणून महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद, गोंदिया च्या सभापती श्रीमती सविताबाई पुराम, अर्थ व बांधकाम समिती, जिल्हा परिषद, गोंदिया चे सभापती योपेंद्रसिंह टेंभरे, समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद, गोंदिया च्या सभापती श्रीमती पूजा सेठ, शिक्षण समिती चे सदस्य श्रीमती विमल कटरे, सशेंद्र भगत, जिल्हा परिषद, गोंदियाचे  सदस्य  लायकराम भेंडारकर, डॉ. लक्ष्मण भगत, शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ महेन्द्र गजभिये, उपशिक्षणाधिकारी (प्राथ) श्री अशोक लांडे, उपशिक्षणाधिकारी (माध्य)  ज्ञानेश्वर दिघोरे, जिल्हा विज्ञान समन्वयक विवेक रोकडे, चिंतामणी स्कूल ट्रस्ट च्या सचिव श्रीमती अमी नीरज पटेल, शाळेच्या मुख्याध्यापिका कु. शिराज शेख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद, गोंदिया चे अध्यक्ष  पंकज रहांगडाले यांच्या शुभ हस्ते देवी सरस्वती तैलचित्रास माल्यार्पण व दीप प्रज्वलना द्वारे करण्यात आले.तद्नंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत रोप देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ महेन्द्र गजभिये यांनी मांडले. श्रीमती सविताताई पुराम व  योपेंद्रसिंह टेंभरे यांनी प्रसंगोचीत विचार व्यक्त करून उपस्थित विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. पंकज रहांगडाले यांनी विविध उदाहरणे देऊन आजच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व विषद केले.

या प्रदर्शनात विविध शाळांच्या विद्यार्थ्याद्वारे एकूण 70 मॉडेल्स ठेवण्यात आले, पैकी 40 माध्यमिक विभाग तर 30 पूर्व माध्यमिक विभागाचे होते.
विज्ञान शिक्षकवृंद यांनी देखील एकूण 22 मॉडेल्स ठेवले.
हे प्रदर्शन विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी उघडे ठेवण्यात आले आहे.कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका श्रीमती अनिता तुरकर व श्रीमती स्वाती वालदे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर दिघोरे यांनी केले.