नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘युवारंग २०२५’ चे सोमवार, दि. १० ते गुरुवार दि. १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा (युवक महोत्सव) दरम्यान ४ दिवस अंबाझरी रोडवरील गुरुनानक भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहणार असून तरुणाईने विद्यापीठाचा परिसर फुलणार आहे.
विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित युवारंग आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेमध्ये फक्त वरिष्ठ महाविद्यालयाचेच विद्यार्थी सहभागी राहतील. विद्यार्थी ३१ जुलै २०२४ रोजी २५ वर्षाचे आतील असावेत. महाविद्यालयाचा एकच सहभागी किंवा चमू प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी ओळखपत्र व महाविद्यालयाचे पत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी संगीत प्रकारातील स्पर्धा गुरुनानक भवन येथे सकाळी ११ ते १२:३० दरम्यान सुगम संगीत, दुपारी १२:३० ते १:३० दरम्यान शास्त्रीय संगीत, दुपारी १:३० ते ३:३० दरम्यान समूहगीत स्पर्धा, दुपारी ३ ते ४ दरम्यान शास्त्रीय ताल, दुपारी ४ ते ५ दरम्यान ताण वाद्य स्पर्धा होणार आहे. मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी साहित्य प्रकारातील स्पर्धा जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात सकाळी १० ते २ दरम्यान वादविवाद स्पर्धा, दुपारी २ ते ३ दरम्यान प्रश्नमंजुषा स्पर्धा, दुपारी ३ ते ४ दरम्यान वेस्टर्न व्होकल सोलो, दुपारी ४ ते ५ दरम्यान वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल सोलो तर गुरुनानक भवन येथे सकाळी १० ते १२ दरम्यान स्कीट (लघु नाटिका), दुपारी १२ ते २ दरम्यान माईम (मूकनाट्य) व दुपारी २ ते ५ दरम्यान मिमिक्री होणार आहे. त्याचप्रमाणे ललित कला प्रकारातील स्पर्धा ललित कला विभाग येथे सकाळी ११ ते १२ दरम्यान पेंटिंग, १२ ते १ दरम्यान पोस्टर, दुपारी १ ते २ दरम्यान क्ले मॉडलिंग, दुपारी २ ते ३ दरम्यान व्यंगचित्र, ३ ते ४ दरम्यान कोलाज, दुपारी ४ ते ५ दरम्यान रांगोळी व दुपारी ४ ते ५ दरम्यान मेहंदी स्पर्धा होणार आहे.
नाटक प्रकारातील स्पर्धा गुरुनानक भवन येथे बुधवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान शास्त्रीय नृत्य- भरतनाट्य, कथ्थक, ओडिसी, कथकली, कुचीपुडी, मणिपुरी, सतरिया, मोहिनी अट्टम इत्यादी प्रकारांचा समावेश राहणार आहे. (चित्रपटातील नृत्य नसावे). त्याचप्रमाणे दुपारी २ ते ५ दरम्यान लावणी स्पर्धा होणार आहे. गुरुवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान लोकनृत्य स्पर्धा होणार असून सायंकाळी ६ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केल्या जाणार आहे. या विविध स्पर्धांचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. राजू हिवसे व विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी केले आहे.
नागपूर : (५-२-२०२५)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘युवारंग २०२५’ चे सोमवार, दि. १० ते गुरुवार दि. १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा (युवक महोत्सव) दरम्यान ४ दिवस अंबाझरी रोडवरील गुरुनानक भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहणार असून तरुणाईने विद्यापीठाचा परिसर फुलणार आहे.