*पी.डी.राहांगडाले विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा विषयी मार्गदर्शन
गोरेगाव दि.०६::: पी.डी.राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे दामिनी पथक पोलिस अधीक्षक कार्यालय गोंदिया द्वारे मार्गदर्शन व समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यशाळेला जिल्हा दामिनी पथक प्रमुख चंद्रकांत काळे पोलीस निरीक्षक, पुजा सुरळकर पी.एस.आय.,सपोनि वैशाली भांदस्कर, पोलिस शिपाई बन्सोड, बोरेले,राहांगडाले,विद्यालयाचे प्राचार्य सी डी मोरघडे,पर्यवेक्षक ए एच कटरे , उपस्थित होते.या कार्यशाळेत मुलींवर होणारे अत्याचार, मुलींची सुरक्षितता,मुलींनी ‘गुड चट बॅड चट ‘कसे ओळखावेत या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.तसेच मुलींशी संबंधित कायदेविषयक मार्गदर्शन, पोस्को कायदा,मुलींशी होणाऱ्या गैरवर्तना पासून सुरक्षित राहण्याकरिता उपाययोजनांवर मार्गदर्शन केले .कार्यशाळेला विद्यालयाचे शिक्षक ,आर वाय कटरे,वाय.के.चौधरी,आर.टी.पटले,एस आर राहांगडाले, जी डब्ल्यू राहांगडाले,स्वाती दमाहे, उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन ए एस बावनथडे व आभारप्रदर्शन झेड जे भोयर यांनी केले.