कौशल्य असेल तर कौतुक होईल -रा. ना. माटे
गोंंदिया,दि.२४ः 21 व्या शतकातील तंत्रज्ञानाचा विकासाचा झपाटा बघता विद्याथ्र्यांमध्ये नवनविन कौशल्य असेल तरच त्यांचे कौतुक होईल असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौषल्य विकास, गोंदिया रा. ना. माटे यांनी एम. जी. पैरामेडीकल काॅलेज मुर्रीचैकीे गोंदियाचा नुकतेच पार पडलेल्या वार्षिक स्नेह सम्मेलनांत अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांनी केले. तसेच मंचावर उदघाटक म्हणून लाभलेल्या मराठी सिनेमा सृष्टीतील अभिनेत्री श्रीमती अमिता कुलकर्णी यांनी सांगीतले की विद्याथ्र्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यामातुन आपले कौषल्य वाढवावे. फक्त पुस्तकी ज्ञान महत्वाचे नसुन कौषल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. या प्रसंगी मंचावर टिव्ही अभिनेत्री श्रृती केकत यांनी सांगितले की जो पर्यंत षिक्षक व पालक परिषद घेणार नाही, तो पर्यंत विद्यार्थी घडणे अषक्य आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. मंचावर उपस्थित एम. जी. पैरामेडीकल काॅलेजचे संचालक अनिल गोंडाणे, मिरावंत हाॅस्पीटल चे संचालक डाॅ. राजेंद्र वैद्य, एन. एम. डी. काॅलेज चे सहाय्यक प्राध्यापक शशिकांत चौरे, निराशा चौरे, जिल्हा कौषल्य विकास, गोंदिया चे समनव्यक संदिप टेंभूर्णे यांनी मार्गदर्षन केले.
या दरम्यान तिन दिवसीय स्नेह सम्मेलनामध्ये विद्याथ्र्यांनी सांस्कृतीक कार्यकमाध्ये एकापेक्षा एक बहारदार नृत्य सादर करुन लक्ष वेधून घेतले होते. विद्याथ्र्यांमधील सुप्त कला गुणांच्या दर्शनाने उपस्थीत मान्यवर व दर्शक सुध्दा मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधुन जे विद्यार्थी शासकिय नौकरीत नुकतेच रुजु झाले. त्यामध्ये ललीत डबले, प्रयोगशाळा तंतज्ञ, गोरेगांव, जितेंद्र दमाहे प्रयोग शाळा तंत्रज्ञ, सालेकसा, आरती चामलाटे, प्रयोगषाळा तंत्रज्ञ, गोरेगांव, मुकेश सिंग बरेले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आमगांव, शुभांगीनी राहंगडाले, प्रयोगषाळा तंत्रज्ञ, तिरोडा, रुपाली चंद्रिकापुरे, प्रयोगषाळा वैज्ञानिक अधिकारी, सालेकसा, सचिन कटरे, प्रयोगशाळा रिसर्च आॅफिसर, नागपूर, वैभव खोटेले, स्थापत्य अभियांत्रीक सहाय्यक, पंचायत समिती, गोंदिया, विक्की खुने प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पवनी, आकाष दिक्षीत, कोरपना, सोहेल सौदागर, अमरावती, शारदा एकांतवार, शासकिय महाविद्यालय, गोंदिया, शुभांगी खोटेले, जि.एम.सी. भंडारा, कयाधु अळे, जि.एम.सी. भंडारा, प्रणाली घोनमारे जि.एम.सी. भंडारा, षितल भांडारकर, शासकिय रुग्नालय भंडारा, श्वेता चन्ने, गोंदिया, खुशबु मसराम, सडक/अर्जुनी यांचा सत्कार करण्यात आला. शेवटच्या दिवषी बक्षिस वितरण प्रमुख अतिथी शिखा पिंपलेवार शाखा अभियंता, गोंदिया, प्रमोद गुडघे व प्राचि प्रमोद गुडघे संचालक, सुपर वूमन समुह, अमित ठवरे, शासकिय महाविद्यालय गोंदिया, महाराष्ट्र नेक्स्ट सुपर माॅडल साक्षी भेलावे,दिप वैद्य, संविधान मैत्रीसंघ समीतीचे संयोजक अतुल सतदेवे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी एम. जी. पैरामेडीकल काॅलेजची प्राचार्या अनुसया लिल्हारे, प्रा. प्रिति वैद्य, प्रा. रामेष्वरी पटले, प्रा. छाया राणा, प्रा. आरती चैधरी, प्रा. मनिष चैधरी, प्रा. गायत्री बावनकर,राजू रहांगडाले, सौरभ बघेले,राजाभाऊ उंदिरवाडे, श्रीमती योगेष्वरी ठवरे, श्रीमती रूपाबाई तसेच काॅलेजचे विद्याथ्र्यांनी सहकार्य केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. छाया राणा व प्रा. आरती चौधरी यांनी केले.