अर्जुनी-मोर.– तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि संशोधनविषयक माहिती मिळावी यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करावे, अशी मागणी एग्रीकिंग फार्मर प्रोड्यूसर कंपनीने केली आहे.
या संदर्भात कंपनीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्जुनी मोरगाव चे सभापती यशवंत परशुरामकर यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तालुक्यातील शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योगांविषयी अद्याप पुरेसे जागरूक नाहीत. त्यांना प्रगतशील शेती पद्धती, संशोधित बियाणे, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगांची माहिती मिळणे गरजेचे आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांना या क्षेत्रातील आधुनिक ज्ञान मिळावे आणि त्याचा उपयोग करून उत्पादन वाढवता यावे, यासाठी अभ्यास दौरा आयोजित करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन संशोधन व तंत्रज्ञानाची ओळख होईल आणि त्याचा उपयोग करून शेती व्यवसाय अधिक फायदेशीर करता येईल.
अशा आशयाचे निवेदन आज नवेगाव बांध येथील फार्मर प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयात यशवंत परशुरामकर यांना देण्यात आले यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते. त्याचप्रमाणे किशोर तरोणे लोकपाल गाहाने रामदास बोरकर होमराज पुस्तोडे उपस्थित होते सदर निवेदनावर विचार करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दौऱ्याला पाठवण्यात बाबत योग्य निर्णय घेऊ आश्वासन श्री परशुरामकर यांनी संचालक मंडळींना दिले.