लोकेश कापगते चे IIT-JAM २०२५ च्या परीक्षेत सुयश

0
1733

अर्जुनी मोरगाव दि.२१::स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयातील बी एस सी भाग ३ चा विद्यार्थी लोकेश सधुजी कापगते याने आय आय टी मधुन पदयुत्तर शिक्षण घेण्याकरिता दरवर्षी घेतली जाणारी देशपातळी वरील परीक्षा IIT-JAM २०२५ पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. त्यांनी ही परीक्षा भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात अनुक्रमे १४५५ व ३७९ ऑल इंडिया रँक घेऊन उत्तीर्ण केली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्याचे आई वडील, श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लूनकरण चितलांगे , संस्थेचे उपाध्यक्ष  बद्रीप्रसाद जैस्वाल, सचिव मुकेश जैस्वाल व सर्व संस्था सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ डी एल चौधरी, गणित विभागप्रमुख प्रा मोहन धुरटकर, प्रा पंकज उके, प्रा हेमंत परशुरामकर, प्रा सुरभी हुमे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले.